Saturday, May 31, 2008

आशियातील सर्वात मोठं...

आशियातील सर्वात मोठं...

वाढत्या औद्योगिकरणाच्या काळात अग्निशमन विभागाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत चालवलं जाणारं 'राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय' आशिया खंडातील सर्वात मोठं अग्निशमन महाविद्यालय मानलं जातं.

......

अग्निशमन सेवेशी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालयाची गरज असल्याच्या शिफारशीनुसार १९५६मध्ये 'राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालया'ची स्थापना उत्तर प्रदेशात करण्यात आली. पण भौगोलिक परिस्थिती आणि हवामानाच्या दृष्टीने सोय म्हणून ते महाविद्यालय नागपुरात हलवण्यात आलं. भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत चालवलं जाणारं हे महाविद्यालय आशिया खंडातील सर्वात मोठं अग्निशमन महाविद्यालय असल्याचं मानलं जातं.

वाढत्या औद्योगिकरणामुळे अग्निशमन विभागाला अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे. महाविद्यालयात सुरुवातीला फक्त एकच विषय शिकवला जात असे. पण देशातील विविध समस्यांच्या समाधानासाठी आणि औद्योगिकीकरणासाठी त्यात अनेक कोर्स सुरु करण्यात आले. महाविद्यालयात आगीसंबंधाने प्रमाणपत्रापासून उच्च शिक्षणापर्यंत अनेक कोसेर्स घेतले जातात. १९७८मध्ये महाविद्यालयाने 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठा'चा फायर इंजिनिअरींग हा साडेतीन वर्षांचा कोर्स सुरू केला. प्रशिक्षणाथीर् अधिकाऱ्यांना आग लागल्यास काय करावं यांच तंत्र यात शिकवलं जातं. विद्यार्थ्यांची निवड भारतीय प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून केली जाते. देशभरातून विद्याथीर् येत असल्याने महाविद्यालयात त्यांच्या राहण्याची व्यवस्था आहे.

विमानाला लागलेली आग आणि त्यापासून बचाव, श्वसन उपकरणं, इमारतींची बांधणी, मूळ भौतिक आणि रसायन विज्ञान, शिस्त, रासायनिक अग्निशमन, वीज आणि त्यापासून उद्भवणारा धोका, प्राथमिक उपचार यांसारखे विविध विषय या अभ्यासक्रमात शिकवले जातात. रासायनिक प्रक्रिया आणि प्रतिक्रिया, आगप्रतिरोधक क्षमता, धोकादायक रसायन इत्यादींच्या प्रात्यक्षिकांसाठी सुसज्ज प्रयोगशाळा आहे. शिवाय वायरलेस कम्युनिकेशन लॅबोरेटरी आहे. इथे सब ऑफिसर्स कोर्स, स्टेशन ऑफिसर्स अँड इन्स्ट्रक्टर कोर्स, डिविजनल ऑफिसर्स कोर्स, श्वसन उपकरण कोर्स, फायर प्रिव्हेन्शन कोर्स, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग असे कोर्स उपलब्ध आहेत.

Source : Maharashtra Times

No comments: