डेट रिकव्हरी एजण्ट
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अॅण्ड फायनान्स आणि इंडियन बँकेच्या संयुक्त विद्यमाने सटिर्फिकेट कोर्स फॉर डेट रिकव्हरी एजण्ट सुरू होत आहे. कर्जवसुली, बँकेच्या पॉलिसीज, सेवासुविधांची अधिकाधिक माहिती करून देणं आणि योग्य मार्गने कर्जवसुली करण्यासाठी सॉफ्ट स्किल्स विकसित करणं हे या कोर्सचं मुख्य उद्दिष्ट आहे.
या कोर्सला प्रवेश घ्यायचा, तर प्रवेश प्रक्रिया पार पाडावी लागते. ट्रेनिंग, परीक्षा, ड्यू डिजिलन्स आणि सटिर्फिकेशन असं एकंदर या कोर्सचं स्वरूप असतं. परीक्षेला बसण्यापूवीर् कोर्ससाठी ट्रेनिंग देण्यात येतं. १०० तासांचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यावरच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अॅण्ड फायनान्सतफेर् दर महिन्याला घेण्यात येणारी परीक्षा उमेदवाराला देता येते. परीक्षा दिल्यानंतर उमेदवार ज्या बँकेसाठी काम करतो, त्या बँकेचं ड्यू डिजिलन्स सटिर्फिकेट सादर करावं लागतं. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या उमेदवाराला कोर्स पास झाल्याचं सटिर्फिकेट देण्यात येतं.
कोर्सची फी मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूटकडून ठरवली जाते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अॅण्ड फायनान्सच्या नियमानुसार कोर्सची फी ६५०० रुपयांपेक्षा अधिक ठेवता येत नाही. यामध्ये परीक्षा फी (१५००)चा समावेेश आहे.
डेट रिकव्हरी एजण्ट कोर्सची परीक्षा पास होण्यासाठी उमेदवार जास्तीतजास्त चार वेळा अर्ज करू शकतात. चार अटेम्प्ट देऊनही परीक्षेत अपयश आल्यास उमेदवाराला या कोर्ससाठी १०० तासांचं ट्रेनिंग पुन्हा घ्यावं लागतं.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अॅण्ड फायनान्सची मान्यता असणाऱ्या इन्स्टिट्यूट्समधून डेट रिकव्हरी एजण्ट कोर्सचं ट्रेनिंग घेता येईल. बँकेतील सीनिअर एक्झिक्युटिव्जशी सल्लामसलत करून या कोर्सची आखणी करण्यात आली आहे.
या ट्रेनिंगअंतर्गत उमेदवारांमधील सॉफ्ट स्क्ल्सि आणि परस्पर संबंध विकसित करण्यावर भर देण्यात येतो.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अॅण्ड फायनान्सशी मान्यताप्राप्त असलेल्या सुमारे ३९ इन्स्टिट्यूट्सची देशभरात १६ सेण्टर्स आहेत. या इन्स्टिट्यूटमार्फत मुंबईमध्ये डेट रिकव्हरी एजण्ट कोर्सचं ट्रेनिंग घेणाऱ्या उमेदवारांसाठी मार्गदर्शनपर वर्कशॉप्स आयोजित करण्यात येतात.
परीक्षेचं स्वरूप
डेट रिकव्हरी एजण्ट कोर्सची परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अॅण्ड फायनान्सतफेर् घेण्यात येते. ही परीक्षा ऑब्जेक्टिव स्वरूपाची असून इंग्रजी आणि मराठी भाषांमध्ये देता येते. ही परीक्षा पास होण्यासाठी किमान ५० टक्के मार्क्स मिळवणं आवश्यक आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अॅण्ड फायनान्सच्या मदतीने बंगळुरू इथे एका कंपनीमार्फत ३१ मे रोजी डेट रिकव्हरी एजण्ट कोर्सची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
संपर्क : वेबसाइट : http://iib.sify.net/
No comments:
Post a Comment